हारपीक पिऊन पोलिस तपासात अडथळा आणण्याचा आरोपीचा प्रयत्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• घुग्घूस मध्ये निघाला प्रशासनाच्या विरोधात आक्रोश कँडल मार्च

• आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठडी

• शुभमवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

घुग्घूस (चंद्रपूर) : वेकोलि रामनगर वसाहतीतील इंजिनियरींगचा विद्यार्थी शुभम दिलीप फुटाणे (25) हत्या प्रकरणातील आरोपीला चार दिवासाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आज रविवारी आरोपी गणेश पिंपळशेंडे ह्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान शुभमच्या मृतदेहाच्या थोड्याशा मिळालेल्या अस्थींचे आज घुग्घूस येथील स्मशानभूमित शोकाकाकुल वातावरणात अंत्यस्कार करण्यात आले. तर पोलिस तपासात अडथळा आणण्यासाठी आरोपीने शौचालयाच्या स्वच्छतेकरिता वापरात येणारे हारपीक पिऊन धमकावल्याच्या धक्कादायक प्रकाराची माहितीही उघड झाली आहे.

17 जानेवारी ला सायंकाळच्या सुमारास मित्रांसोबत जेवन करण्याकरिता निघालेल्या शुभमचे रस्या्वत अपहरण करण्यात आले होते. आणि शुभमच्या मोबाईल वरूनच त्याच्या घरी फोन करून आई वडिलांना 30 लाखाची खंडणी मागीतली होती. खंडणी न मिळाल्यास जिवेनिशी मारण्याची धमकी दिली होती. आई वडिलांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर तब्ब्ल महिनाभर शुभमचा शोध घेण्यास पोलिस अपयशी ठरले. अपहरणाच्या दुस-या दिवशी घुग्घूस येथे शुभमच्या आढळून आलेल्या दुचाकीवरील रक्ताच्या डागावरून पोलिसांना तपासाची दिशा गवसली होती. काही दिवसापूर्वीच घुग्घूस येथील सात वर्षीय वीर नामक बालकाचे अपहरणाची घटना ताजी होती. त्यातील आरोपी गणेश पिंपळशेंडे ह्या आरोपीकडे संशयीत म्हणून पोलिसांची नजर होती. परंतु सबळ पुरावा अभावी ते अपयशी ठरत होते. त्याच्या घरी जावून त्याची झाडाझडती घेण्याचा प्रयत्नक घटनेच्या दहा पंधरादिवसापूर्वी घुग्घूस पोलिसांनी केला होता. परंतु आपल्याला वारंवार पोलिस त्रास देत असल्याचे कारण करून शौचालयाकरिता वापरात येणारे हॉरपीक पिऊन जिव देईन अशी धमकी पोलिसांनी दिली होती. शिवाय पोलिसांपुढे घुटभर हारपीक पिऊन त्यांना घरून वापस जाण्यास भाग पाडले होते.

मात्र दुचाकीवरील रक्ताचे आणि आरोपीचे रक्ताचे नमुन्यात साम्य आढळून आल्याने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या समक्ष घटनास्थळावरून शुभमच्या अस्थितींचे काही भाग पोलिसांना हस्तगत करता आले. खड्यात राखेखाली अस्थीं दाबून ठेवल्याने त्या जळालेल्या सारखे पोलिसांनी दिसून येत होते. परंतु आज रविवारी सखोल निरीक्षण केले असता त्या जळालेल्या नसल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. शुभमची इतर ठिकाणी हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह कुजल्यानंतर उरलेल्या अस्थी काढून घुग्घूस स्वागत लॉनलगत वदर्ळीच्या ठिकाणी खड्यात राखेमध्ये पुरण्यात आल्याचे तपासात दिसून येत आहे. मात्र आरोपीने याबाबत काहीही माहिती दिली नाही.

चौकशी दरम्यान आरोपीकडून बरीच माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपीला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर चौकशीला सुरूवात झाली आहे. शुभम हत्या प्रकरणात एकट्या गणेश पिंपळशेंडे हा सहभागी नसून अन्य काही आरोपी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आरोपीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो एकटाच सहभागी असल्याचे त्याचे म्हणने आहे.