गुन्हेगारीचे विश्लेषण : “वीर” बचावला ; “शुभम” मारला गेला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• विकृत मानसिकतेला राजकीय अभय
• शुभमच्या मृत्यूची जबाबदार कोण घेणार ?

चंद्रपूर : काल शनिवारी घुग्घूस येथील तब्बल महिनाभरापासून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या शुभम फुटाने या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे घटना उघडकीस आली. पहिले अपहरण करायचे, त्यानंतर खंडणीची मागणी करायची आणि मागणी पूर्ण झाली नाही तर हत्या करायची असाच प्रकार शुभम फुटाणे याच्या बाबत घडला. जिवंत जाळून हत्या करण्यात आली.

फक्त पोलिसांच्या हातात शुभमच्या डोक्याची कवटी गवसली. थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घुग्घूस येथील घटना संपूर्ण जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. एखाद्या आरोपीची ही विकृत मानसिकता का तयार व्हावी ? यावर आता चिंतन करण्याची वेळ आली आहे. कारण घुग्घूसच्या शुभम फुटाणे या विद्यार्थ्याच्या हत्येची घटना आता राजकीय नेते आणि पोलिस प्रशासनाला चिंतन करायला लावणारी आहे.

जेम – तेम तीन महिण्यापूर्वी 03 नोव्हेंबर 2020 ला घुग्घूस शहरातील व्यवसायिक सनी खारकर यांचा 7 वर्षीय मुलगा वीर खारकर यांचे भर दिवसा शुभम हत्या प्रकरणातील आरोपीनेाच अपहरण केले होते. दुचाकीने नागपूर येथे नेले होते. त्याच्याही आईवडिलांकडून वीरच्या सुटकेसाठी याच प्रकारे खंडणी मागितल्या गेली असती. परंतु तत्पूर्वी सक्रीय सोशल मिडीयावरील युवा वर्गाने त्याला वाचविण्यात मौलाची मदत केली.

आरोपीने नागपूरातील विमातनळ परिसरातत वीर ला सोडून पळ काढला. आणि सात वर्षीय वीर पोलिसांच्या मदतीने आपल्या आई वडिलाकडे पोहचला. नशिब बलवत्त्र म्हणून वीर बचावला. मात्र शुभम याला अपवाद ठरला. एका निरागस बालकाचे अपहरण करणाऱ्या विकृत मानसिकतेचा आरोपी गणेश पिपळशेंडे याला त्यावेळी कठोर शिक्षेची गरज होती. किंबह्रुना पोलिश प्रशासला त्याच्या विकृत मानसिकतेची भनक लागायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. आरोपीची हिम्मत वाढत गेली आणि त्याच्या विकृत मानसिकतेचा उपदव्याप सुरूच राहिला. पहिल्या प्रकरणात सवलत मिळाल्याचे आरोपीचा पुढचा टारगेट कदाचित ठरणारच हे म्हणने चुकीचे ठरणार नाही. वीर सारख्या लहान बालकाच्या अपहरणात या आरोपीच्या मुसक्या आवळ्या गेल्या असत्या तर कायद्याची जरब निर्माण झाली असती पण तसे झाले नाही.

कायद्याचा धाकच नाही असी परिस्थीती वीर अपहरण प्रकरणातही झाली. आता आपल्या पोलिश प्रशासनही विविध कारणांमुळे स्वतंत्रपणे काम करणे जिकरीचे ठरते आहे. त्यामुळे सैराट आरोपी आपल्या गुन्हेगारीचा धाक निर्माण करतात आणि पुढे त्यातून एखादी मोठी घटना घडते. त्या मोठ्या घटनेशी शुभम फुटाणे हत्या प्रकरणाच्या घटनेला जोडणे चुकीचे होणार ठरणार. पोसिस प्रशासनात राजकीय हस्तक्षेप हल्ली वाढलेला दिसतो आहे. कायदा बाजूला सारून “काही” पांढ-या खादीतील राजकीय नेत्याचे म्हणने पोलिस प्रशासनाली एैकावे लागते. नाहीतर पोलिसांसाठीही नोकरी करणे कठिण ठरते. मात्र नंतर त्याचे जे दुष्यपरिणाम घडतात त्याला जबाबदार कौण ? असा प्रश्न साहजिकच पडल्याशिवाय राहणार नाही.

वीर अपहरण प्रकरणातील आरोपीला ही जामीन एका राजकीय नेत्याच्या इशारावरच मिळाला. आणि आरोपी मोकळा झाला. त्याने केलेकल्या गुन्ह्याची भिती त्याच्यात राहिली नाही. आणि पुन्हा त्याने पुढचा टारगेट शुभम ठरविला. तब्बल महिना भर अपहरण झालेल्या शुभमचा पत्ताही पोलिसांना वेळेवर घेता आला नाही. आणि जे व्हायला नको होते ते होवून गेले. जिवंत जाळून शुभमची हत्या करण्याचा घोर अपराध विकृत मानसिकतेचा आरोपी गणेश पिंपळशेंडे ह्याच्या हातून घडल्याचे उघड झाले. आता पुढे काय ? परत काही दिवसांनी, महिन्यांनी या विकृत मानसिकतेच्या आरोपीची जामीन होईल. कुणी मोठा व्यकती जामीनीसाठी पडद्याआडून मदतही करेल. पण आता चिंतन पोलिस प्रशासनालाही करावा लागेल. कायद्याचा धाक निर्माण करायचा कि राजकीय नेत्याच्या दबावात सामान्य जनतेला सुरक्षेला सुरंग लावायचा.

त्यांच्यासोबतच पांढ-या खादीतील त्या राजकीय नेत्यांनाही चिंतन करावे लागेल. जे छोट्या छोट्या प्रकरणात पोलिस प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करतात. आरोपींची सुटका करण्यासाठी बालीसपणाचा अट्टाहास करतात. सामान्य जनतेला सुरक्षेची हमी द्यायची असेल तर राजकीय नेत्याच्या पोसिल प्रशासनातील हस्तक्षेपाला थांबविणे गरजेचे आहे. नाही तर राजकीय नेत्यांच्या दडपशाहीने आरोपीं मोकाट फिरतील आणि शुभम फुटाणे सारख्या इंजिनियरच्या विद्यार्थ्यांचा बळी जातच राहील. गुन्हेगारीच्या धाका एैवजी कायद्याचा धाक निर्माण झाला नाही तर शुभम फुटाणे सारख्या एखाद्या इंजिनिअरला पुन्हा बळी जाईल. आणि एकाद्या कुटूंबातील आई वडिलांना आपल्यश मुलापासून पोरके व्हावे लागेल.