मतदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी ग्रा. पं. सदस्यांनी घेतले हातात फावडे

0
443
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• ग्राम पंचयायत सदस्यांनी केले सरपंचाच्या घरासमोरून नालीची सफाई

चंद्रपूर : निवडणूक ग्रा.पं.ची असो, विधानसभेची की लोकसभेची. प्रत्येक निडणूकीत उभा असलेला उमेदवार हा गाव विकासाच्या आणाभाका घेतो आणि मतदारांसमोर हातजोडून मत मागतो. रात्रदिवस मतदारांशी प्रचारात तो मतासाठी सलोखा निर्माण करतो. मात्र निवडणूक झाली, निकाल हातात आले की मतदारांचा नेहमीप्रमाणे पध्दतसीर विसर पडतो. अपवादात्मक सोडले तर कुठे गावविकासाच्या आणाभाका आणि कुठे मतदारांच्या समस्या निवडणी दरम्यान घेतलेल्या “आणाभाकांना” तिलांजली दिलेली पहायला मिळते. परंतु चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही ग्राम पंचायतचे काही ग्राम पंचायत सदस्य याला अपवाद ठरले आहेत. गावातील नाल्यामध्ये साचून असलेल्या सांडपण्याची विल्हेवाट सफाई करण्यासाठी मासिक मिटींग मध्ये सरपंचांना गळ घातली. परंतु सरपंचांनी वेळीच निर्णय न घेतल्याने आज रविवारी 14 मार्च चक्क् सरपंचांच्या घरापासून चार सदस्यांनी हातात फावडे नाल्यातील सांडपाण्याची स्वच्छता केली. नागरिकांच्या आरोग्यासाठी चार सदस्यांनी केलेल्या स्वच्छतेची चर्चा परत गावविकासाच्या दृष्टीने ऐकायला मिळत आहे.

नऊ सदस्यश् असलेल्या ग्राम पंचायत सारखरवाही येथे नव्यानेच निवडणूक पार पडली. येथे सरपंच म्हणून निरज बोंडे यांनी पदभार सांभाळला. नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापीत केली आहे. पाच सदस्या काँग्रेस तर चार सदस्य हे भाजपाचे आहेत. निवडणुकीत या सदस्यांनी स्थानिक मतदारांना गावविकासाचे विविध प्रलोभने दिले. आश्वासन दिले आणि विकासाच्या आणाभाकाही घेतल्या. सत्ता स्थापीत झाल्यानंतर पहिला मासिक सभा 26 फेब्रुवारी ला पार पडली. यावेळी ग्रा.पं सदस्य विनोद खापने,प्रिया ढवस, कीर्ति कडुकर, भाऊराव कुडमीथे आदींनी गावातील नाल्यातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. नाल्यासांडपाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत. नागरिक आपल्याला विचारताहेत. नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी करताहेत. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी त्या बैठकीत विनोद खापने आणि त्यांच्या समर्थीत सदस्यांनी लावून धरली होती. यावर लवकरच निर्णय घेऊ असे उत्तर देऊ असे उत्तर असामाधानकारक उत्तर दिले होते. त्यानंतर ठोस पाऊले उचलण्यात आले नाही, त्यामुळे अखेर आज 14 मार्च ला नागरिकांना आपण दिलेल आश्वासन पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रा.पं सदस्य विनोद खापने,प्रिया ढवस, कीर्ति कडुकर, भाऊराव कुडमीथे यांनी सांडपाण्याने भरलेल्या नाल्याची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला.

सरपंच नीरज बोंडे यांचे घरासमोरून सुरूवात करून नालीची स्वच्छता करण्यात आली. ग्राम पंचायत सदस्यच हातात फावडे घेवून नालीची स्वच्छता करू लागल्याने नागरिकही अचंबित झाले. ग्राम पंचायत सदस्य हातात फावडे घेऊन स्वच्छता करू लागल्याने काही नागरिकांनी त्यांना सहकार्य केले. निवडणूकीत गावविकासाच्या आणाभाका घेऊ शकतो तर आणाभाका हाताता फावडे घेऊन पूर्णत्वास आणू शकतो हे आज रविवारच्या गावविकासाच्या घटनेवरून दिसून येत आहे. आज रविवारी काही कारणास्तव सरपंच हे गावात नव्हते मात्र त्यांच्या मागे नालीची स्वच्छता ग्रा.पं. सदस्यांनी केलेल्या नागरिकांमध्ये ज्यांच्या कार्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
चारही सदस्यांनी सरपंच नीरज बोंडे यांना पाच दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. पाच दिवसात गावातील संपर्ण नाल्याची स्वच्छता करा. अन्यथा गा्रम पंचायत ला टाळे टोको आंदोलन करून असा इशारा दिला आहे. काहीही असो साखरवाहीत चार सदस्यांनी हातात फावडे घेऊन नाल्या स्वच्छता करण्याचे धारिष्ठ दाखविले. आणि त्यांना नागरिकांनी सहकार्य करीत स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला, हे वाख्यानाजोगे आहे. अशाच प्रकारे ग्राम पंचायत स्तरावर ग्राम पंचायतसदस्यांचे गावातील समस्यांकडे लक्ष केंद्रीत झाले तर त्यांना पूर्ण होवू शकतात. आणि गावात लोकसहभागाची भावना रूजविली जावू शकते, हे साखरवाहीतील घटनेवरून दिसून येत असल्याच्या प्रतिक्रीया साखरवाहीत व्यक्त केल्या आत आहेत.

या बाबत सरपंच निरज बोंडे यांनी, 26 फेब्रुवारीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. परंतु कागदोपत्री प्रकिया करावी लागत आहे. मार्च महिण्याच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. आणि गावातील नाल्याचा प्रश्न सोडविला जाईल, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.