भद्रावती बिएसएनएल टॉवरवर चढून दोघांची वीरुगीरी

0
215

• विज कनेक्शन तोडणे थांबविण्यासाठी आंदोलन, तहसिलदाराच्या लिखीत आश्वासनानंतर विरूगिरी मागे

चंद्रपूर : नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात राज्याच्या उप मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकरी, घरगुती ग्राहक,व्यापारी कुणाचेही विद्यूत तोडली जाणार नाही असी घोषणा केली होती. तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विज तोडणी बाबत घेतलेली स्थगिती उठविल्याची घोषणा केली. महावितरण कंपनीने थकीतदार विज ग्राहकांचे विद्युत कनेक्शन तोडत ग्राहकांना शॉक देण्याचा प्रकार सुरू झाला.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अन्यायकारी आणि तुघलकी निर्णयाच्याविरोधात आज रविवारी भद्रावती येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे दोन पदाधिका-यांनी विरूगिरी स्टॉईल आंदोलन केले. तब्ब्ल सहा घंटे बिएसएनएलच्या टॉवरवर चढून जिल्ह्यातील विज ग्राहकांचे कनेक्शन तोडू नका अशी मागणी लावून धरली. अखेर तहसीलदारांनी घटनास्थळी येवून आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लिखीत आश्वासन दिल्याने सहा तासानंतर विरूगीरी आंदोलन मागे घेण्यात आले. तालुका युवा जनता मोर्चाचे इमरान अफझल खान, केतन शिंदे खाली उतरले.

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामिण तर्फे महाविकास आघाडी सरकारला निवेदन, आंदोलन करून विज ग्राहकांचे विज बिल कनेकशन न कापता त्यांना विजबिल माफी द्यावी अशी मागणी वारंवार लावून धरली होती. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशन विजे बाबत निर्णय होत नाही तोपर्यंत ग्राहकाचे विज कनेक्शन कापनार नाही अशी घोषणा राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. परंतु अधिवेशन संपताच आपल्या निर्णयावर ठाम न राहता थकीत ग्राहकांच्या विज तोडणीबाबत दिलेली स्थगिती अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्जामंत्री नितीन राऊत उठविण्याची घोषणा करून अप्रत्यक्षरित्या वसुली करण्याच्या सुचना दिल्या.

त्यामुळे महावितरण कंपनीने थकीत शेतकरी शेतकरी,शेतमजूर,व्यापारी आणि गरिब नागरिकांचे विदयुत पुरवठा कापने सुरू केले आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने जिल्हाउपाध्यक्ष इम्रान खान आणि केतन शिंदे यांनी सकाळी आठवाजताचे सुमारास भद्रावती येथील बिएसएनएलच्या टॉवर चढून विरूगिरी स्टॉईलने आंदोलनला सुरूवात केली. दुपारी दीडवाजेपर्यंत तब्ब्ल सहा तास दोघेही आंदोलक हे टॉवरवर चढून होते. आंदोलनाची दखल घेतली नाही तर खाली उतरणार नाही शिवाय जबरदस्तीने उतरविण्याचा प्रयत्न केला तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. भद्रावतीचे तहसीलदार यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येवून आंदोलकांना खाली उतरण्यास विनंती केली परंतु त्यांनी कोणताही प्रतिसादर न दिल्याने तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी विज माफी हा आमच्या अखत्यारितला विषय नाही, तो शासनाचा विषय आहे. त्यामुळे त्याबाबत आपल्याल्या कोणतेही आश्वासन किंवा लिखीत देता येणार नाही मात्र याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करून आपल्या मागण्या शासनस्तरावर कळविता येईल. आपण मागण्या लेखी द्याव्यात असे तहसीलदारांना चर्चेतून सांगितले. तहसीलदार भद्रावती यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेले निर्देश लिखीत स्वरूपात दिल्याने तब्ब्ल सहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.