नागपुर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या अंदाजानुसार 14 आणि 15 एप्रिलला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती , यवतमाळ भंडारा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वाशिमध्ये 16 एप्रिलला विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.