सोनुर्ली पाकडहिरा नाल्यात पुरात अडकले पुलाचे काम ; पुलाचे विलंबाने व निकृष्ट बांधकाम

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या पाकड हिरा या गावाला जोडणाऱ्या चिंचोली गावाजवळील नाल्यावरील सी डी वर्कचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत सुरू करण्यात आले. पावसाच्या तोंडावर कंत्राटदाराने कामाची सुरुवात केली. सदर नाल्यावरील जुने खोदकाम बॅड काँक्रेट टाकून पाईप फसवण्यात आले.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर केर कचरा तसेच पुराड पाईप मध्ये फसल्याने त्या परिसरात बंधाऱ्याचे स्वरूप प्राप्त झाले. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे गावाकडे जाणारा रस्ता संपूर्ण बंद झाला आहे.

सदर कंत्राटदाराने विलंबाने व निकृष्ट बांधकाम करीत असल्यामुळे पहिल्याच पुराच्या पाण्याने कामाच्या दर्जाचा उलगडा झाला आहे. हा रस्ता संपूर्ण बंद झाला असल्यामुळे ऐन शेतकऱ्यांच्या हंगामात शेतात जाण्याला अडचण निर्माण झाली आहे. तात्पुरता जाणे-येणे करिता नाल्यातून रस्ता तयार करण्याची मागणी गावकरयांनी केली आहे.