शेतात काम करणा-या महिलेवर अस्वलाचा हल्ला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : महिलेवर अस्वलाचा हल्ला त्यात ती गंभीर जखमी वाघेडा गावामधील शेतशिवारातील घटना
चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वाघेला शेतशिवारात काम करणार्‍या महिलेवर अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सोमवारी दूपारच्या सुमारास घडली.तुळसाबाई शामराव चौधरी वय (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे.या प्रकाराने शेतक-यांमध्ये दहशत पसरली आहे.

चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वाघेडा येथील तुळसाबाई शामराव चौधरी ही महिला आज दूपारी ४ वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात काम करीत होती. अचानकपणे अस्वलाने महिलेवर हल्ला केला. लगतच्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना सदर घटनेची कल्पना आल्याने त्यांनी आरडाओरड करून मदतीसाठी धावून आल्याने अस्वल पळून गेली. त्यामुळे अस्वलाच्या तावडीतून महिलेची सुटका झाली. सदर महिलेच्या तोंडावर हल्ला गंभीर दुखापत झाली आहे.

सर्वप्रथमचिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्या महिलेला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे वाघेडा व लगतच्या शेतक-यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.