बेघर झालेल्या भार्गताबाईच्या घराचे काँग्रेस करून देणार पुनर्निर्माण

0
329

घुग्घूस : येथील अमराई वॉर्ड क्रं.1 मध्ये राहणाऱ्या भार्गताबाई सिडाम या वयोवृद्ध विधवा महिलेच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली मोल मजुरी करणाऱ्या माऊलीने जमविलेले दहा हजार रूपया सह घराचे फाटे, अन्न – धान्य, कपडे, घरातील अन्य साहित्य जळून खाक झाले आणि रातो – रात ही माऊली बेघर झाली.

झोपडी वजा घर हे अतिक्रमण असलेल्या जागेवर असल्याने शासकीय मदद मिळणार नसल्याने भार्गताबाई पुढे उघड्यावर राहण्याची वेळ आली
ही बातमी दीपक पेंदोर या समाजसेवी युवकांने घुग्गुस काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांना सांगितले असता राजुरेड्डी यांनी अमराई येथे जाऊन घराची पाहणी केली व भार्गताबाई यांची व्यथा जाणून घेतली.
व त्यांना तातळीने घर बांधकाम करून या सोबत अन्न – धान्य ही देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये,दीपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे,प्रेम गंगाधरे सचिन कोंडावार, शहजाद शेख, देव भंडारी, साहिल सैय्यद, कुणाल दुर्गे, सुनील पाटील,संपत कोंकटी आदी उपस्थित होते