शुभमच्या मारेकऱ्यांना जाहीर फाशी द्या : काँग्रेसची निवेदनातुन मागणी

0
505

घुग्घूस : शुभम फुटाणे या 25 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे 17 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. तब्बल 28 दिवसाच्या कालावधी नंतर काल दिनांक 13 फिब्रवरी रोजी घुग्गुस बायपास मार्गाजवळील नाल्यात शुभमचा मृतदेह आठळून आला या हत्येच्या आरोपात संशयित गणेश पीपळशेंडे याला अटक करण्यात आली.

याप्रकरणात अटक केलेल्या मारेकऱ्यांसह अजून ही आरोपी शामिल असल्याचा संशय असून याप्रकरणाचा सखोल तपास करून अन्य आरोपींना ही तातळीने अटक करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना जाहीर फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना घुग्गुस ठाणेदार यांच्या मार्फ़त देण्यात आले.

याप्रसंगी शिष्टमंडळात घुग्गुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, विशाल मादर, नुरुल सिद्दीकी, रोशन दंतलवार, राजू पोल, साहिल सैय्यद, कुणाल दुर्गे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.