चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती-धोपटाला कॉलनी जवळील रेस्ट हाऊसच्या स्वयंपाक घरासमोरील टिनच्या शेडमध्ये गळफास लावून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडीस आली. मृतकाचे नांव स्वप्नील मनोहर गायकी वय २३ असे असून मृतक आई-वडिलांसोबत
सास्ती-धोपटाला कॉलनील क्वार्टर मध्ये राहत होता. आत्महत्येचे नेमके कारण काय हे मात्र कळू शकले नाही. मृतक युवकाचा परिवारात आई-बाबा व तीन बहिणी आहेत. स्वप्नील आई-बाबांचा एकुलता होता. पुढील तपास पोलीस करीत आहे.