सावधान! उठसूट सॅनिटायझर वापरू नका…

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी साबणाने हात धुण्याचा किंवा सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. मात्र साबणाने हात धुण्यापेक्षा लोक हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करत आहेत. असं वारंवार हँड सॅनिटायझर वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात असं याआधी अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आता केंद्र सरकारनेही नागरिकांना याबाबत सावध केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून देशभर सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्याची सक्ती असल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होत आहे. परंतु सहा महिन्यांनंतर आता सॅनिटायझरचे साइड इफेक्ट्स जाणवू लागले आहेत.

हँड सॅनिटायझरचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. सॅनिटायझरपेक्षा साबणाचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

तर याबाबत शारीरिक तज्ज्ञ म्हणतात की, सॅनिटायझरचा उठसूट म्हणजे अति वापर केल्यास, तसेच खराब क्वालिटीचे सॅनिटायझर वापरात आल्यास हाताला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडून सोलून निघते.

जर सॅनिटायझर वापरावे लागतच असेल, तर हँड ग्लोव्हज वापरा आणि तेच वारंवार सॅनिटाइज करा. त्यामुळे सॅनिटायझरचा साइड इफेक्ट होणार नाही. परंतु, त्यासाठी ब्रँडेड सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे, असे त्वचाविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.