Lloyd’s Metals | अधिकाऱ्यांनी केले आंदोलक नेत्यांवर पैशे घेतल्याचे आरोप

लाॅयड्स मेटल कंपनी कामगारांचे ठिय्या आंदोलनाला हिंसक वळन

चंद्रपूर : दिनांक 14 ऑगस्ट सकाळी ६ वाजता पासून घुग्घुस येथील लाॅयड्स मेटल कंपनी मेन गेट समोर कामगारांच्या मागण्या करिता ठिय्या आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलन 15 ऑगस्ट रोजी ही शुरुच आहे कंपनीचे प्रशांत पुरी यांनी संघटनेच्या नेत्यांवर कामगारा समक्ष पैशे घेतल्याचा खळबळजनक आरोप केला यामुळे नेते व अधिकारी यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याने गेट जवळ तणाव निर्माण झाला.
आज सकाळी ६ वाजता दरम्यान कंपनीचे कामगार जमा झाले संतप्त कामगारांत व कंपनीच्या अधिका-यात बाचाबाची सुरु होऊन धक्काबुक्की झाल्याने गेट जवळ गोंधळ उडाला. यामुळे पोलीसांना बोलावुन
गेट जवळ घुग्घुस पोलीसांना तैनात करण्यात आले.

शुक्रवार ला सकाळी ६ वा कामगारांना २६ दिवसाचे काम देणे, लाॅकडाऊनच्या काळातील उर्वरीत वेतन देने, कामगारांचा वेतनवाढ करार करणे, कामगारांचे ग्रेडेशन करणे, ५८ वर्ष पुर्ण झालेल्या ३ कामगारांना काढण्यात आले त्यांना कामावर परत घेणे, मॄत्यु झाले कामगारा़च्या कुटुंबीयांना कामावर घेणे, लाॅकडाऊनच्या काळातील १४ सुपरवाइजरचे संपुर्ण वेतन देणे अश्या मागणी साठी कंपणी गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

लाॅयड्स मेटल स्पंज आयर्न कामागार संघटना,व कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली परंतु 24 तास होऊं सुद्ध तोडगा निघाला नाही.