पोलीसांशी हातापायी पडली महागात ; तिघांना चौदा दिवसाचा एमसीआर

0
1904
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील मोठेगाव येथे मतदानाच्या दिवसी शुक्रवार ला जिल्हा परिषद शाळेतील बुथ परिसरात नागरीकांची गर्दी जमली होती गर्दी पांगविन्यासाठी पोलीस व नागरीक यांच्यात हातापायी झाली दरम्यान तिन व्यक्तीना पोलीसांनी ताब्यात घेवुन अटक केली त्यांना शनीवार ला चिमूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसाचा एमसीआर दिला त्यामुळे पोलीसांबरोबर हातापायी करने महागात पडले आहे

शुक्रवार ला तालुक्यातील 80 ग्रामपंचायतची निवडणूक होती दरम्यान 231मतदान केंद्रावर पोलीसांचा चोख बंदोबस्त होता सकाळच्या दरम्यान मोठेगाव येथे बुथ जवळ व मतदान केंद्राच्या आत पोलीस बंदोबस्त लावन्यात आला होता येथील जिल्हा परिषद शाळे जवळील मतदान केंद्र बुथ वर दोन पार्टीतील नागरीकांत शुल्लक कारणावरून वाद झाला होता नागरीक बुथ जवळ जमाव करून गोंधळ घालत होते त्यांना पांगविन्यासाठी पोलीस प्रयत्न करीत होते नागरिकांनी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी विशाल राजूरकर यांची कॉलर पकडली व चिमूर पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक अलीम शेख यांचेवर चवताळून आले काही पोलीसांवर दगडफेक करन्याचा प्रयत्न केला गेला पोलीसाच्या खाजगी वाहनाची नुकसान केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला नागरीक व पोलीस यांच्यात हातपायी झाली या हातपायीत अनेक पोलीस बचावले वेळेवर जास्तीची पोलीस कुमक बोलावली नसती तर अनेक पोलीस व नागरीक जखमी झाले असते दरम्यान मोठा अनर्थ ठळला. मतदान केंद्र बुथ जवळील जमावातील मयुर पुरुषोत्तम दडमल 30 वर्ष, भगवाण गुप्तदास रामटेके 37 वर्ष, रवी गणूजी खोब्रागडे 31 वर्ष रा मोठेगाव यांना शुक्रवार ला ताब्यात घेतले होते दरम्यान मोठेगाव ला मतदानाच्या दिवसी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते

मतदान केंद्रा जवळ नागरीकांचा जमाव झाला होता या जमावाने पोलीसांना मारहान केल्याच्या आरोपामध्ये तिन्ही व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेवुन अटक केली त्यांचेवर भादवी कलम 504, 332, 353, 186, 34 नुसार गुन्हा दाखल करून चिमूर न्यायालयात या तिन आरोपींना हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसाचा एमसीआर दिला आहे. मोठेगाव येथे शनीवारला तनावपूर्ण शांतता होती मात्र पोलीस व नागरीक हातापायी दरम्यान काही पोलीसांनी मोबाईल विडीओ चित्रीकरण केले होते या चित्रीकरना वरून पुन्हा गावातील पंधरा विस नागरीकांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावन्याची शक्यता आहे अशी माहिती आहे.