वेकोलि बल्लारपूर – सास्ती ओपन कास्ट मध्ये डम्पर पलटल्यामुळे एक कामगारांचा मृत्यू

0
1714

चंद्रपूर : बल्लारपूर सास्ती वेकोलीच्या ओपन कास्ट मध्ये सकाळच्या पाळीत ड्युटी मध्ये आपल्या कार्यावर गेलेल्या वेकोली कर्मचारी अक्षय खरतड रा.बल्लारपूर यांचा सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास अपघात घडला या अपघातात त्यांचा उपचार करताना मृत्यू झाला सूत्राच्या माहितीनुसार डम्पर पलटल्यामुळे सदर अपघात घडल्याची माहिती असून या अपघातामुळे क्रोधीत झालेल्या नागरिकांनी या अपघातग्रस्त डपंर ला आगीच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला.

वेकोली प्रबंधन मात्र सदर अपघाताच्या घटनेला सारवासारव करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.

अपघात घडल्याची माहिती उशिरा मिळाल्याची माहिती वेकोली प्रबंधन यांनी दिली कोळसा खाली करतांना सदर अपघात घडल्याची माहिती असून गाडी मागे घेतांना गाडी खोल खड्डयात पडल्यामुळे झालेल्या अपघातात कर्मचारी अक्षय खरतड यांचा मृत्यू झाला .