वेकोलि दुर्गापूर खुल्या खाणीजवळ मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात एक ठार

0
412

चंद्रपूर : वेकोलि दुर्गापूर येथील खुल्या खाणीजवळ मध्यरात्री 2 वाजता दुर्गापूर येथील वार्ड नंबर 2 एकता चौकात राहणारे 40 वर्षीय नरेश वामन सोनावणे सीनाळा जंगल परिसरात गेले असता अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांचेवर हल्ला चढविला. #NewsPost या हल्ल्यात बिबट्याने नरेश सोनावणे यांना ठार करीत शरीराच्या काही भागावर ताव मारला.

घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत परिस्थिती हाताळली. आज वनविभागाच्या चमूने घटनेचा आढावा घेतला, सोनावणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.