चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये अतिरिक्त २५ सेंट्रलाईझ सप्लाय ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करा :  आ. बंटीभाऊ भांगडीया यांची प्रशासनाकडे मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील वाढती कोरोना रूग्‍ण संख्‍या व वाढता मृत्‍युदर लक्षात घेता ज्‍या आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत त्‍यावर मात करण्‍यासाठी चिमूर येथील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र कुठेही न पाठवता इथेच उपचार घेता यावा व रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता २५ ऑक्सिजन सेंट्रलाईझ बेड्स तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार बंटी भांगडीया यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी व प्रशासन सोबत संपर्क करून केली आहे.

चिमूर तालुक्यात कोरोना रूग्‍णांची संख्‍या वेगाने वाढत आहे. या ठिकाणी सा-या व्‍यवस्‍था कोलमडुन गेल्‍या आहेत. बेडस् उपलब्‍ध नाही, पेशंटना दवाखान्‍याबाहेर चोवीस – चोवीस तास बाहेर उभे राहावे लागत आहे, एकुणच चिंताजनक अवस्‍था निर्माण झाली आहे. मृत्‍युदर वाढत चालला असून, तालुका प्रशासन व आरोग्‍य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
चिमूर येथून प्रत्येक जिल्ह्य मुख्यालय व जिल्हा आरोग्य यंत्रणांचे अंतर १०० की.मी च्या अधिक असून, इथे उपचार होणं कठीण आहे. रुग्णांची प्रकृती चिंताजनक होताच त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी हलविल्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि चिंतेची बाब म्हणजे अशी की, सध्यस्थीतीत सगळीकडे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बेड्स ची कमतरता भासत आहे. तात्काळ बेड्स उपलब्ध होणं कठीण झालं आहे त्यातच चिमूर येथे मोठे असे सर्वसुविधायुक्त खाजगी दवाखाने सुद्धा नाहीत. आणि सध्यस्थीतीत कोविड सेंटर ला पाहिजे त्याप्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत वाढत्या रुग्णसंख्येनुसार बेड्स ची संख्या सुद्धा अपुरी पडत असून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आणि उपलब्ध झालेला ऑक्सिजन साठा पुर्ण वेळ पुरत नसल्याने अतिगंभिर समस्या निर्माण होवून रुग्णांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो..

हे लक्षात आल्यानेच किमान तातडीने २५ बेड्स सेंट्रलाइझड्स ऑक्‍सीजन सप्लाय पद्धतीने रूग्‍णांसाठी बेड्स उपलब्‍ध झाल्‍यास कोरोना आटोक्‍यात येण्‍यास मोठी मदत होईल. चिमुर तालुक्यातील रुग्णांना इतरत्र कुठेही न जाता इथेच उपचार घेता येईल. होणाऱ्या धावपळीचा त्रास सुद्धा कमी होईल, यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून याबाबतचा प्रस्‍ताव मांडण्यात आला. कोविड सेंटर चिमूर येथे २५ ऑक्सिजन सेंट्रलाईझ बेड्स तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आ. बंटी भांगडीया यांनी जिल्ह्याधिकारी, प्रशासन कडे केली आहे.