• यंग चांदा ब्रिगेडची मागणी
• मनपा आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर : बेड अभावी होत असलेली कोरोना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने अत्याधुनिक कोरोना रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अदिवासी विभाागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राशिद हुसेन आदिंची उपस्थिती होती.
कोरोना महामारीने थैमान घातला आहे. परिणामी रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. सद्यस्थितीत असलेली आरोग्य व्यवस्था व उपलब्ध आरोग्य संसाधने वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रनेविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. परिणामी आरोग्य यंत्रणा सुदृढ होणे अत्यावश्यक आहे. या दिशेने जिल्हा प्रशासन युध्द पातळीवर काम करत आहे. यात आता महानगर पालिकेनेही योगदान देणे गरजेचे आहे.
महानगरपालीकेकडे रुग्णालय सुरु करण्याकरिता आवश्यक असलेली संसाधनेही उपलब्ध आहेत. त्यामूळे आता राज्यातील इतर महानगरपालिकांच्या धर्तीवर चंद्रपूर महानगरपालिकेनेहि कोविड रुग्णालय सुरु करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ दयावा अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.