चंद्रपूर : शहरातील भिवापूर येथील भंगाराम वार्ड येथील ओगले कुटुंबाला जातीच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने जात पंचायतीने त्यांना बहिष्कृत केले होते, ओगले यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्याची तयारी कुणीही दाखवली नाही त्याकारणाने ओगले कुटुंबातील मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.
ही घटना नागरिकांना समजल्यावर त्यांनी जात पंचायत प्रमुखांवर संताप व्यक्त केला, आमदार किशोर जोरगेवार यांनी जात पंचायत प्रमुखांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या त्यानंतर गणेश ओगले यांनी जातपंचायतीच्या प्रमुखांविरोधात शहर पोलिसात तक्रार दिली.
त्यानंतर 7 पैकी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतक नामे प्रकाश ओगले हे गोंधळी जोशी समाजाचे असुन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ३० वर्षापुर्वी त्यांचे समाजातील लोकांनी जात पंचायतीच्या माध्यमातुन जातीचे बाहेर काढले होते . आणि जात पंचायतीच्या लोकांनी असे फरमाना काढले होते की , कोणीही त्यांचे घरी कोणत्याही सुखदुखाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही , चंद्रपुर शहरात त्यांचे समाजाचे फक्त तिनचं कुटुंब राहत होते . दिनांक ०६/०६/२०२१ रोजी तकारदार गणेश प्रकाश ओगले वय ३२ जात गोंधळी जोशी रा . भंगाराम वार्ड चंद्रपुर यांचे वडील प्रकाश ओगले हे मृत पावल्याने त्यांचे अंतिम संस्काराला ते समाजातुन बहिष्कृत असल्याने त्याचे समाजातील कोणतेही लोक उपस्थित झाले नाही . अशा घटनेवरून तकारदार गणेश ओगले यांनी त्यांचेवर बहिष्कार लावलेल्या जात पंचायतीच्या लोकांविरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे ४७४/२०२१ कलम ५.७ महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासुन व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ सहकलम ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला केला . सदर गुन्हयात दिनांक १५/०६/२०२१ रोजी आरोपी नामे १ ) सुरेश शंकरराव वैराडकर वय ७२ जात गोंधळी रा . शिरसपेठ रामकुलर नागपुर , २ ) सुरेश गंगाराम गंगावणे वय ६५ जा . गोंधळी रा . गुजरी इस्लामपुरा यवतमाळ , ३ ) मोहन सितारामजी ओगले वय ७४ जा . गोंधळी रा . सुभाष वार्ड पुसद यवतमाळ , ४ ) कैलाश नारायणराव वैराडकर वय ७० जा . गोंधळी , बासटाल रायपुर छत्तीसगड , ५ ) प्रेम सुरेश गंगावणे वय ४६ रा . गुजरी इस्लामपुरा यवतमाळ , ६ ) विनोद गणपतराव वैराडकर वय ४८ रा . गाडीखाना नागपुर यांना अटक करण्यात आली आहे . पुढिल तपास पोलीस उपनिरिक्षक श्री . जगताप हे करीत असुन पुढिल तपास सुरू आहे.

















