दसऱ्याच्या दिवशी मदधुंद युवकांचा हैदोस

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : चंद्रपूर मार्गावरील धानोरा फाटा जवळ शुक्रवारी दसरेंच्या दिवशी दुपारी चार वाजताच्या जवळपास MH34 – BF 6872 डिजाईर कार मध्ये अंतुर्ला येथील निवासी राहुल तुरणकार वय 24 वर्ष, दिनेश जांबुडकर, वय 27 वर्ष, उमेश कौरासे वय 28 वर्ष हे तिघे धानोरा येथे बार मध्ये दारू पिऊन गावाकडे सुसाट निघाले.

मात्र पाचशे मीटर अंतरावर चालकाचा वाहणावरील नियंत्रण सुटला व कार माईनस्टोन दगडाला एवढ्या जोरात धडक दिली की गाडी चित्रपट स्टाईलने उडत दोन पलट्या मारल्या कार पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली कार मधील एअरबॅग वेळीच उघडल्याने जीवितहानी झाली नाही.

युवकांना किरकोळ मार लागला घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पो.स्टे.चे वाहतूक विभागाचे गजानन झाडे, विनोद लोखंडे, सुरेश पंडाल, घटनास्थळी पोहचून युवकांना उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविले व पोलीस तपास शुरू आहे.