चंद्रपूर जिल्हा बँके मध्ये 5 कोटींचा घोटाळा; रोखपाल निलंबीत

0
871
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• बँकेचा रोखपाल निखील घाटे फरार

• अध्यक्षांचे बँकेच्या सिईओंवर घोटाळ्याचे खापर फोडण्याचा प्रयत्न

• सतराशे ग्राहकांची फसणवूक झाल्याची प्राथमिक माहिती

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सतरोश ग्राहकांच्या घोटाळा प्रकरणात बँकेचे रोखपाल निखील घाटे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने निलंबीत केले असून रोखपाल फरार झाला आहे. चंद्रपूर शहर शाखेत रोखपालाने सुमारे दीड कोटींच्या रकमेची अफरातफर केल्याचे प्रकरण शनिवारी उघडकीस आले असून सोमवारी घोटाळ्याची रक्कम 5 कोटींच्या पुढे असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी बँक सुरू होताच अनेक ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. ग्राहकांनी खातं तपासले असता अनेक खात्यात रोखपालाने पैसे टाकलेच नसल्याचा गंभीर प्रकार पुढे आला. मात्र मंडळाने हा प्रकार अंगलट येत असल्याचे लक्षात येताच काल मंगळवारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या सिइओंवर घोटाल्याने खापर फोडले आहे.

ग्राहकांनी त्यांच्या खात्यात भरण्यासाठी दिलेले पैसे रोखपाल घाटे याने स्वतःच लंपास केले. शुक्रवारी जेव्हा एका सोसायटीने मुख्यालयाकडे तक्रार केली, तेव्हा या घोटाळ्याचं बिंग फुटलं. शनिवारपासून या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू झाली तेव्हा आकडा सव्वा कोटीच्या पुढे आला होता. पण सोमवारी 15 फेब्रुवारी ला सकाळपासून सुरू झालेला तक्रारींचा ओघ बघता हा घोटाळा सुमारे 5 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून ग्राहक, सभासद शेतकरी, सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतीचे कारभारी तक्रारी घेऊन येत आहेत. या शाखेतील सुमारे 1700 ग्राहकांना बँकेने मोबाईलवरून मेसेज पाठवले असून, हे सर्व ग्राहक आल्यावर खरा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. रोखपालानं केलेल्या अपहार प्रकरणी बँकेने रविवारी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 420 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. काल सोमवारी रोखपाल मात्र फरार झाला आहे. बँकेकडून घोटाळेबाज आरोपीला प्रयत्न होत असल्याचा आरोपी ग्राहकांनी केला आहे.

दरम्यान, बँकेने ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील या बँक शाखेत एक अधिकारी नियुक्त केला असून, ग्राहकांना मोबाईलवर मेसेज पाठवले असल्याची माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांनी दिली.आरोपी रोखपाल घाटे याने अफरातफर केलेल्या पैशांचा वापर आयपीएलवरील सट्टा खेळण्यासाठी, ओळखीच्या लोकांना व्याजाने देण्यासाठी वापरल्याची माहिती पुढे येत आहे. पण एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर एक सामान्य कर्मचारी कुणाचे पाठबळ असल्याशिवाय कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

● चंद्रपूर मध्यवर्ती शहर शाखेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याचे खापर सिईओंवर

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन बँकेतील कोटयवधींच्या घोटाळ्याचे खापर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सिईओंवर फोडले आहे. जिल्हा बँकेने आपल्याच मुख्य कार्यकारी अधिका-याला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या सोबतच सहकार मंत्री बाळसाहेब पाटील या घोटाळ्याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे. घोटाळ्याची पहिली सुचना महावितरण कंपनीने सर्वात पहिले सांगितले होते. वीज देयकांची रक्कम खात्या नोंद होत नसल्याची माहिती दिली होती. दोनदा स्मरण पत्र दिल्यानंतर देखील बँकेचे याकडे दुर्लक्ष झाले. 30 पतसंस्था आणि वैयक्तिक ग्राहकांनी आजवर विशेष कक्षात तक्रारी दाखल केल्या आहेत. सगळीकडे घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाही बँकेचे अध्यक्ष काल मंगळवारी समोर आले. तक्रारीचा वाढता ओघ बघता 5 कोटींच्या घरात हा घोटाळा असल्याचे सुत्राची माहिती आहे.