शुभम फुटाणे यांना कॉंग्रेस तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित

0
262

घुग्घूस : येथील वेकोलीच्या रामनगर वसाहतीत राहणारे 25 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी शुभम फुटाणे यांचा 17 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले व 28 दिवसा नंतर शुभम यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

आज 17 फेब्रुवारी रोजी घुग्घूस काँग्रेस कार्यलयाच्या प्रागणात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

शुभम यांना मेणबत्ती व पुष्पगुच्छ वाहून व दोन मिनिटे मौन ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच शुभम यांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी घुग्घूस शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर, अनिरुद्ध आवळे, प्रफुल हिकरे, शहजाद शेख, जावेद कुरेशी, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, विशाल मादर,रोशन दंतलवार, संपत कोंकटी, सुधाकर जुनारकर, रंजीत राखूडे,सुनील पाटील सौ.संगीता बोबडे, सौ.विजया बॅडीवार,अमिना बेगम, संध्या मंडल, सरस्वती पाटील, दुर्गा पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.