अकोल्यात भूकंपाचा सौम्य धक्का, 3 रिश्टर स्केलवर नोंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात शनिवारी (17 एप्रिल) ला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. 3 रिश्टर स्केलवर त्याची नोंद घेण्यात आली.

अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूर नजीक 19 किमी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. लाँग आणि लाँगीट्यूड अनुक्रमे 20.75 व 76.83 दाखवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.