जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी दिला कँन्सरग्रस्त रुग्णाला दिला मदतीचा हात

चंद्रपूर : राजकारणापलीकडे जात संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देणे ही खरी समाजसेवा असुन लोकप्रतीनीधीचे ते कर्तव्य आहे असे समजून गांगलवाडी-मेंडकी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य प्रमोद चिमुरकर हे नेहमीच गरजूंच्या मदतीला धावून जात असतात.

ब्रम्हपुरी तालुक्यातील तुलानमेंढा येथील वासुदेव मारोती आळे हे अल्पभूधारक शेतकरी असून ते कँन्सरग्रस्त आहेत. त्यांची आर्थिक परीस्थिती हलाखीची असल्याने उपचार करण्यासाठी ते हतबल झाले आहेत.सदर रुग्ण हा प्रमोद चिमुरकर यांच्या जि.प.क्षेत्रात मोडणाऱ्या गावातील नसला तरी राजकारणापलीकडचा विचार करत माणुसकीपोटी मेंडकी-गांगलवाडी जि.प. क्षेत्राचे सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी सदर रूग्णाच्या घरी जावून त्याची व त्याच्या कुटुंबियाची भेट घेत प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. व त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत सुध्दा दिली.

यावेळी जगदीश पुराम, दिवाकर गेडाम, विलास गेडाम, बबलु मडावी, दिवाकर गायकवाडे, चंद्रभान शेंडे, पुंडलिक ठाकरे आदि नागरीक यावेळी उपस्थित होते.