घुग्घुस : खासदार बाळु भाऊ धानोरकर घुग्घुस दौऱ्यावर आले असतांना वेकोलीच्या व्ही.आय.पी. गेस्ट हौस येथे पदमशाली समाज बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सिनू गुडला,विजय माटला यांनी खासदारांची भेट घेवुन नवनिर्मित पदमशाली समाजभवन येथे वाचनालयाची मागणी केली असता खासदार यांनी वाचनालय निर्मितीचे आश्वासन दिले.
याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, प्रेमानंद जोगी, सुनील पाटील व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.