महाऔष्णिक वीज केंद्राने प्रदूषण थांबवावे, अन्यथा कारवाई करा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वीज केंद्राने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तत्काळ प्रदूषण कंट्रोल युनिट लावून प्रदूषण कमी करावे. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

वीज केंद्राने शहराच्या काही अंतरावर ५०० मेगावॅटचे दोन संच सुरु केले आहेत. त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. परिसरातील घरांमध्ये राखेचा थर साचत आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजाराचा सामना करावा लागत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ प्रदूषण कंट्रोल युनिट लावन्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ दिवसांत सर्व माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आजच्या बैठकीत निर्देश दिल्याची माहिती यावेळी वडेट्टीवार यांनी दिली. वीज केंद्राने टेक्नॉलाजी चा वापर करून प्रदूषण कमी करावे. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करावी अशाही सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.