कुठल्याही गुन्हेगारांची गय केली जाणार नाही : ठाणेदार राहुल गांगुर्डे

घुग्घुस : अमराई वॉर्डातील सुरज गंगाधर माने व त्यांची पत्नी रत्नमाला सुरज माने यांचे अत्यंत दुःखद निधन झाले घटनास्थळाची एकंदरीत परिस्थिती पाहता सदर दाम्पत्याची हत्याच करण्यात आल्याचा संशय असून आरोपी हा परिसरातीलच असल्याचा नागरिकांचा दावा आहे.

याप्रकरणातील आरोपीचे नाव ही पोलिसांना दिले असून त्यांना तातळीने अटक करा या मागणीसाठी शेकडो महिला – पुरुष यांनी तीन तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला काल काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सांयकाळी या प्रकरणातील संशयित आरोपीना अटक करून कडक कारवाई करण्या संदर्भात निवेदन दिले होते.

आज प्रेतयात्रा निघण्यापूर्वी ठाणेदारांनी या प्रकरणातील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेस नेते राजुरेड्डी, रोशन पचारे, सैय्यद अनवर यांनी धरून लावली असता ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी उपस्थित जनसमुदायाला या प्रकरणातील कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नसून पोलीस आपली भूमिका चोख वाजवून आरोपींना अटक करतील संशयित आरोपी हा राज्या बाहेर पडाला असून लवकरात लवकर त्याला अटक करू कुणी ही प्रेतयात्रा थांबविन्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती केली असता नागरिकांनी पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून अंतिम यात्रा काढली. अत्यंत शोकाकूल परिस्थितीत रत्नमाला माने यांचा अंतिम संस्कार पार पाडण्यात आला. शांती व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता दंगा नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आला होता.