ब्रम्हपुरी : राज्याचे कँबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून ब्रम्हपुरी शहरात एन.डी. गारमेंट कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असुन या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महीलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे मत ब्रम्हपुरी नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा सौ. रीताताई उराडे यांनी व्यक्त केले.
ब्रम्हपुरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मागील परीसरातील सभागृहात असलेल्या एन.डी. गारमेंट या गारमेंट मेकींग प्रशिक्षण केंद्राला त्यांनी सदीच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ब्रम्हपुरी नगरपरीषदेच्या नगरसेविका सुनीताताई तिडके, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका लताताई ठाकुर, एन.डी. गारमेंटचे संचालक निलेश गुल्हाणे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे म्हणाल्या की, सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून काही दिवसांत ब्रम्हपुरी तालुक्यासह आजुबाजूच्या तालुक्यातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे सदर गारमेंट क्लस्टरचे महिला सक्षमीकरणासाठी महत्वाचे योगदान असणार आहे. यामुळे भविष्यात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी सदर प्रशिक्षण केंद्रातील ६०० महिलांची उपस्थिती होती.