वरोरा तालुक्यातील पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

नराधम आरोपी जेरबंद

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव जवळील अर्जुनी येथे रविवारी १७ आॅक्टोबर ला एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश नामदेव गजभे (वय 27) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, नवरात्री महोत्सव निमित्याने शारदा देवी जवळ महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होता. जेवण करून घरी जात असताना पाच वर्षांच्या चिमुरडीला एकटी पाहून मोहल्यातीलच नराधम आरोपी गणेश नामदेव गजभे (वय 27) याने तिला रस्तालगत असलेल्या गुराच्या गोठ्यात नेले व तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार केला. सदर घृणास्पद दृश्य एका महिलेला आढळून आला. त्या महिलेने सर्व प्रकार तिच्या आई ला सांगितला. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन आईने पीडित अल्पवयीन मुलीसह शेगाव पोलीस स्टेशन गाठले व सर्व प्रकार येथील पोलीस स्टेशन ठाण्यात सांगितला.

ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी आरोपी गणेश नामदेव गजभे याला कलम 376 एबी 376 (2) ( जे ) भांदवी सहकलम ६ पास्को नुसार ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात PSI प्रवीण जाधव करीत आहे.