डॉ. शीतल आमटेंचे पती गौतम करजगी मुलासह पुण्याला रवाना, पण शविलचे नाव वरोऱ्याच्या अनिस पब्लिक शाळेतच

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वरोरा (चंद्रपूर) : जगप्रसिद्ध समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात तथा महारोगी सेवा समिती आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतल आमटे (करजगी)यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपासा करिता आवश्यक असलेला फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल घटनेच्या आज अठराव्या दिवशीही प्राप्त झालेला नसल्याचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांनी सांगितले. दरम्यान डॉ शितलचे पती गौतम करजगी, तिचा मुलगा व सासू सासरे हे आनंदवन येथून पुण्याला रवाना झाले.ते किती दिवसाकरिता आनंदवन सोडून गेले ही माहिती मात्र मिळू शकली नाही.

वरोरा येथील जगप्रसिद्ध समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात तथा महारोगी सेवा समिती आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतल आमटे यांचा दि. ३० नोव्हेंबर रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या संदर्भात करजगी व आमटे कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या पार्श्वभूमीवर डॉ शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना असा संशय देखील व्यक्त केला जात होता. त्यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन घेतल्याची खून असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्यास डाव्या हाताने उजव्या हाताला इंजेक्शन टोचले हे स्पष्ट होईल परंतु यावरच संशय व्यक्त केला जात असल्यामुळे पोलिस देखील संभ्रमात आहे आणि ते फॉरेन्सिक व शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहे..

आज बुधवार दि 17 डिसेंबर अठरा दिवस घटनेला लोटले असतांना पोलिसांना फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल मिळाला नसल्याने पोलीस हतबल दिसत आहे. फॉरेन्सिक लॅब व अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे.

करजगी कुटुंब पुण्याला रवाना

डॉ शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी हे आनंदामध्ये अंतर्गत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ शीतल यांच्या मृत्यूनंतर ते इथे राहतात कि, आनंदवन सोडून बाहेर गावी जातात याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते.डॉ शितल चे पती गौतम करजगी यांच्यासह डॉ शितल यांचे सासू-सासरे आणि मुलगा हे देखील आनंदवनात वास्तव्यास होते. दिनांक १३ डिसेंबर नंतर हे सर्व आनंदवन सोडतील अशी शंका उपस्थित केली जात होती. दरम्यान शीतल चे पती, मुलगा आणि सासू सासरे दि १५ डिसेंबर रोजी आनंदवन मधून बाहेर पडले आणि पुण्याला रवाना झाले. हे कुटूंब नेहमी साठी बाहेर गावी गेले की काही दिवसांसाठी हे मात्र कळू शकले नाही. पुण्याला गेल्यावर करजगी कुटुंबातील व्यक्तींकडून आणखी काही गोष्टींचा उलगडा होतो का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

मुलगा शविल ची टिसी शाळेतच

डॉ शितल आमटे करजगी यांचा मुलगा शविल वरोरा येथील सेंट अनिस पब्लिक स्कूल मधे शिकत आहे .करजगी कुटूंबीय शविल ला घेऊन पुण्याला गेले असले तरी त्याची टिसी शाळेतच आहे.