भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदात्यांचा सत्कार

0
203
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मी रक्तदात्यांच्या ऋणात राहू इच्छितो – देवराव भोंगळे यांचे मनोगत

घुग्घूस : येथील प्रयास सभागृहात रविवारला सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसा निमित्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

21 नोव्हेंबर 2020 ला गांधी चौकात भव्य महारक्तदान शिबीर घेण्यात आले. या महारक्तदान शिबिरात 717 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते तसेच जिल्ह्यात 1007 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

त्यामुळे रक्तदात्यांच्या सन्मानार्थ प्रयास सभागृहात हेल्मेट व कॅन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
रक्तदात्यांना हेल्मेट व कॅन देऊन सत्कार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी देवराव भोंगळे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, नकोडा-मार्डा जिप क्षेत्राचे सदस्य ब्रिजभूषण पाझरे, तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले, उपसभापती निरीक्षण तांड्रा, प्रकाश बोबडे, संजय तिवारी, सिनू इसरप, वैशाली ढवस, लक्ष्मी नलभोगा, नंदा कांबळे, सुचिता लुटे, विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, रत्नेश सिंग, संजय भोंगळे, अनिल मंत्रिवार, सुनील राम, सुरेश खडसे, इम्तियाज रज्जाक मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात युवमोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे म्हणाले सोळा वर्षांपासून ज्या उत्साहाने कार्यक्रम घेण्यात येत आले आहे त्याच उत्साहाने आज हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. घुग्घूस येथील महारक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना मागील तीन वर्षा पासून हेल्मेटचे वाटप करण्यात येत आहे. घुग्घूस येथे 12 आरओ मशीन चे उदघाटन झाल्याने त्यासाठी सहकार्यांनी कॅन उपलब्ध करून द्यावी असे सांगितले होते त्यामुळे यावर्षी कॅन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. देवरावदादा च्या वाढदिवसाच्या निमित्य रक्तदान शिबीर घेणे हा आमच्या परिवाराचा आवडता कार्यक्रम आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदा चहावर रक्तदान शिबीर घेतले तेव्हा जवळपास 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते, पुढे वटवृक्षा प्रमाणे रक्तदात्यांनीची संख्या वाढत गेली असे ते म्हणाले.

यावेळी विशेष 13 महिला रक्तदात्यांचा शाल व श्रीफळ आणि कॅन देऊन सत्कार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन साजन गोहणे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी केले तर आभार दशरथ असपवार यांनी मानले. कार्यक्रमास घुग्घूस प्रयास सखी मंच मुख्य मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, घुग्घूस प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, निरंजन डंभारे, श्रीकांत सावे उपस्थित होते.