घुग्घुस : येथील एसीसी सिमेंट कंपनीतील न्यू पॅकिंग प्लांट मधील वादग्रस्त ठेकेदार नितीन शर्मा यांनी अजून पर्यंत कामगारांना वेतन दिलेले नाही. 21 तारखे पासून जिल्ह्यात जनता कॅफ्यु लागणार असून जीवनावश्यक साहित्याची खरेदीसाठी ही कामगारकडे पैशे नसल्याने कामगार कुटुंब अडचणीत आलेले आहे.
तर दुसरीकडे न्यू. पॅकिंग प्लांट मधील कामगार मोठ्या संख्येने कोरोना बाधीत झाले असून होम आईसोलेशन मध्ये आहेत. या कामगारांना ही आर्थिक त्रास होत असून तातळीने कामगारांचे वेतन न दिल्यास नाईलाजाने कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रवादी कामगार संघटनेला आपल्या स्टाईलने रसत्यावर उतरावे लागेल याला पूर्णतः एसीसी व्यवस्थापकच जवाबदार राहतील.
संकटाच्या काळात एसीसीने कामगारांना वेठीस धरू नये अन्यथा त्यांचे दुष्परिणाम कंपनीला भोगावे लागतील असा इशारा कामगार नेते सैय्यद अनवर यांनी दिला आहे.