• शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी
• देशाच्या प्रगतीसाठी मोदी सरकार हटविण्याचा संकल्प करा : खासदार बाळू धानोरकर
• राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा
चंद्रपूर : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी (ता. १९) संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची होळी करण्यात आली.
यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी, केंद्रातील मोदी सरकारच्या मागील सात वर्षांत देशात बेरोजगारी वाढली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे केले जात आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण केले जात आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असून, त्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी मोदी सरकार हटविण्याचा प्रत्येकांनी संकल्प करावा, असे आवाहन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर बोलत होते. खासदार धानोरकर पुढे म्हणाले, देशात कोरोनाने मोठा हाहाकार माजविला असताना उपाययोजना करण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले.
महागाई, इंधन दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे भक्तांसुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, भक्त काहीही बोलू शकत नाही. यापूर्वी महागाई वाढली म्हणून रस्त्यावर उतरणारे भाजपचे नेते एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढूनही कुठेच दिसत नाही, अशीही टीका यावेळी केली. यावेळी रितेश तिवारी, प्रकाश देवतळे, प्रवीण पडवेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला कॉंग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, सरचिटणीस ओबीसी विभाग उमाकांत धांडे, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुताई दहेगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, नगरसेवक अमजद अली, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष शालिनी भगत, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस हरीश कोत्तावर, युवक काँग्रेस सचिव रूचीत दवे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, प्रभारी युवक काँग्रेस इर्शाद शेख, ओबीसी शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, चंद्रपूर शहर महिला काँग्रेस उपाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, शहर उपाध्यक्ष सुनंदा धोबे, शहर सचिव वानी डारला, सदस्य संध्या पिंपळकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल कातकर, लता बारापात्रे, इंटक युथ जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, शहर अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग सुलेमान अली, शहर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग कृणाल रामटेके, मोहन डोंगरे, चंद्रमा यादव, नौशाद शेख, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, प्रकाश देशभ्रतार, रुषभ दुपारे, धीरज उरकुडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.