गोवा येथे होणार्‍या T-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपसाठी निखिता ढोरके यांची निवड

नेपाळ येथे T-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी

चंद्रपूर : नेपाळ येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय T-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून देशाचे नाव उंचविणार्‍या चंद्रपूर येथील निखिता ढोरके तसेच गोवा येथे होणार्‍या T-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपसाठी निखिता ढोरके यांच्यासह निवड झालेल्या रॉबिन नळे, मनोज मंगम यांचे यश अभिमानस्पद असल्याचे सांगत विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपातर्फे त्यांना आर्थिक मदत केली.

उपजत कलागुणांना संधी मिळाली की आकाशाला गवसणी घालता येते याची प्रचिती दुर्गापूर येथील निखिता ढोरके या खेळाडूने दाखवून दिले आहे. नुकत्याच 7 ते 11 ऑक्टोबरला नेपाळ येथील पोखरा शहरात भरलेल्या इंटरनॅशनल T-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताला प्रथम क्रमांक पटकावून देत चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. तसेच गोवा येथे 20 ते 22 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या नॅशनल T-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपसाठी निखिता ढोरके यांच्यासह रॉबिन नळे व मनोज मंगम या दोन खेळाडूंची निवड झाली झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आर्थिक मदत देखील मुनगंटीवार यांनी केली.

दरम्यान, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान व भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम, शैलेंद्रसिंह बैस यांनी या तिन्ही खेळाडूंना भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.