गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव रेती घाटावर खनिकर्म विभागाची धाड

0
250
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कारवाईचा देखावा – साटेलोट्यातून वाहने सोडल्याची खमंग चर्चा

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव रेती घाटावरून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात वाळू तस्करी केल्या जात असुन स्थानिक अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खनिकर्म विभागाने घातलेल्या धाडीत अनेक वाहने अवैधरित्या रेती तस्करी करीत असताना सापडले. मात्र खनिकर्म अधिकाऱ्यांनी केवळ दोन ट्रॅक्टर जप्त केल्याचा कारवाईचा देखावा करीत साटेलोट्यातून अनेक वाहने सोडले याची खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने स्थानिक महसूल अधिकाऱ्यांची संबंध प्रस्थापित करून गेल्या अनेक महिन्यांपासून रेती चोरीचा गोरखधंद चालविला आहे. याला जोड म्हणून काही इतरही रेती माफियांनी यात हिस्सेदारी भूमिका घेत स्थानिक महसूल अधिकाऱ्यांची संगणमत करून रात्रपाळी पोकलॅण्ड मशीन द्वारे तसेच ट्रॅक्‍टरच्या साह्याने नदीपात्रातून रेती उत्खनन करून अवैधरित्या वाहतुकीतून ठिकाणी पुरवठा रेतीचा केल्या जात असल्याची माहिती खनिकर्म विभाग चंद्रपूर यांना मिळताच विभागाच्या चमूने काल रात्रीच्या सुमारास नांदगाव रेती घाटावर धाड मारली. याप्रसंगी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार दर घाटावर पंधराहून अधिक ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने उत्खनन सुरू होते मात्र खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडीत सापडलेल्या सात ट्रॅक्टर वर कारवाई करण्याऐवजी केवळ दोन ट्रॅक्टर वर रेती चोरी ची कारवाई करीत कारवाईचा देखावा करून उर्वरित पाच ट्रॅक्टर आर्थिक देवाणघेवाणीतून सुखरूप सोडल्याचे माहिती उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून येथे सुरू असलेल्या प्रीती तस्करीच्या गोर्धन यामुळे नदीपात्रात खोलवर वाळूचा उपसा करण्यात आला असून ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच दैनंदिन चालणारा या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडालेला असून महसूल विभागाला जाग केव्हा येणार ? तसेच काल सोडण्यात आलेल्या उर्वरित पाच ट्रॅक्टर व अन्य हायवा ट्रक यांचे वरही कारवाई होणार का ? असा यक्ष प्रश्न तालुक्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.