शार्ट सर्किटमुळे ईलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग,  लाखोंचे नुकसान ; अग्निशमन दलाचे काय?

0
270

चंद्रपूर : सावली येथील एका वेल्डिग वर्क्स व ईलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आज शनिवारी (20मार्च ) रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यात लाखो रुपयाचे नुकसान झाले असून सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर दुकान अभय बोरूले यांच्या मालकिचे आहे.

सावली येथील पंचायत समिती जवळ बोरूले यांचे दुकान आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास शहरात विजेच्या कडकडाटा सह वादळी वारा व पावसाने हजेरी लावली. त्याच दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे दुकानाला आग लागली. यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती होताच नागरिकांनी मूल व गडचिरोली येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. परंतु अग्निशमन दल वेळेवर पोहचू न शकल्याने दुकानाचे आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याकरिता नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मागील दोन वर्षापासून सावली शहारा करिता अग्निशमन दलाची मागणी करण्यात येत आहे, परंतु संबधित विभाग याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यानी मागील महिन्यात अग्निशमन दलाची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजून पर्यंत अग्निशमन दल शहराला मिळाले नाही.