भरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याला 45 लाखांने लुटले ;  आरोपींच्या शोर्धात पोलिस रवाना

0
974
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 

वणी (यवतमाळ) : तालुक्यातील निळापूर मार्गावर असलेल्या इंदिरा जिनिंग मधील कर्मचारी बँकेतून 45 लाख रुपयांची रोकड दुचाकीने घेऊन जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या दोन इसमांनी रोकड हिसकावून नेल्याची घटना आज शनिवारी (20 मार्च) ला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिस सुत्रांनुसार, वणी तालुक्यातील निळापूर मार्गावर अनिल अग्रवाल यांच्या मालकीचे इंदिरा जिनिंग आहे. या जिनींगमध्ये अनेक वर्षांपासून जंगले नामक कर्मचारी कामावर आहे. बँकेचे व्यवहार या व्यक्तीकडे असल्याने 45 लाख रुपये बँकेतून काढण्याकरिता खाती चौकातील बँक ऑफ बडोदा मध्ये आला होता. 45 लाखाची रोकड एका पिशवीत घेऊन ते ऍक्टिवा या दुचाकीने जंगले हे जिनाच्या दिशेने निघाले. निळापूर मार्गावरील अहफाज कॉटन जिनिंग जवळ पोहचताच पाळतीवर असलेल्या चोरट्यानी चारचाकी वाहनाने त्याचा दुचाकी वाहनाला मागून धडक दिली असता तो खाली पडला. व चार चाकी वाहनातून दोन इसम उतरले त्यातील एकाने जंगले यांचे तोंड दाबले तर दुसऱ्याने गाडीवर ठेवलेली पिशवी घेऊन पोबारा केला. आपण लुटल्या गेल्याचे जंगले यांच्या लक्षात येताच त्यांनी घडलेली घटना मालक अग्रवाल याना सांगितली. या बाबत वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार वैभव जाधव यांनी चारचाकी वाहन गेल्याच्या दिशेने पोलीस पथके रवाना केली आहे.