अनुदानित कोळशाची अवैध विक्री करणारे जेरबंद ; 33.77 लाखाचा मुद्देमाल जप्त ; 7 आरोपी अटकेत, कुबेर वर्मा व सहजाद हे दोघे फरार

0
527

चंद्रपूर : वेकोलीच्या माध्यमातून लघु उद्योगांना सवलतीत कोळसा पुरविण्यात येतो. याच उच्च प्रतीच्या कोळशाची अवैध विक्री करणारे टोळके वणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी तब्बल 33 लाख 77 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रामविलास रामलखन भारद्वाज (33) शास्त्रीनगर घुग्घुस जि. चंद्रपूर, अमरनाथ पपाप्रसाद निसाद (28) रा. ग्राम दडीया ता. खागा जि. फतेपुर उत्तरप्रदेश ह मु. बेलोरा चेकपोष्ट ता.वणी, मुकेशकुमार गणेश चौधरी (42) रा. चेकपोष्ट शिरपुर, इमरान कमरूद्दीन सैयद (42)रा.साधनकर वाडी, अब्दुल कमिरल उर्फ बबलु भाई शेख कासम (52) शास्त्रीनगर वणी, सुनिल शामराव काळे (42) गणेशपूर, अटलबिहारी लोकेश्वरानद गिरी (40) रा. मंगलम् पार्क वणी अश्या 7 आरोपींना अटक करण्यात आली तर वंदना ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक कुबेर वर्मा व प्राईड मेटल इंड्रस्ट्रीज नागपूर चे संचालक सहजाद हे दोघे फरार आहेत.
देशातील लघु उद्योगाला चालना मिळावी याकरिता शासन स्तरावरून अल्प दरात कोळसा पुरविल्या जातो. लघु उद्योग करणारे व्यावसायिक हजारो टन कोळशाची खरेदी वेकोली कडून करतात. मात्र काही उद्योग डबघाईस आले असून कागदोपत्री सर्व सुरळीत असल्याचा बनाव करीत वेकोलीद्वारे अनुदानित कोळशाची उचल करतात व तोच चांगल्या प्रतीचा कोळसा चढ्या दराने खुल्या बाजारात विकत असल्याचे या पूर्वी सुद्धा उघड झाले आहे. असे रॅकेट वणी तसेच चंद्रपूर परिसरात सक्रिय आहे. या अफरातफरी मुळे वेकोली सोबतच शासनाची मोठया प्रमाणात फसवणूक होत आहे.

ठाणेदार वैभव जाधव यांना निलजई कोळसा खदान मधुन प्राईड मेटल इंडस्ट्रिज,एम. आय.डी.सी. बुटीबोरी नागपुर येथे तीन ट्रक मधून जाणारा कोळसा लाल पुलिया परिसरातील कोल डेपोत खाली होणार असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी सकाळीच प्राप्त झाली होती. यामुळे त्यांनी स्थानिक गुन्हे शोध पथकाला आदेश देत लालपुलिया परिसरात सापळा रचला. यावेळी एम.एच.-34.ए. बी.- 5475, एम.एच.-34.ए. बी.3174, एम.एच.-34- ए. व्ही. 0992 असे तीन ट्रक किंमत 30 लाख रूपये व 75.46 में.टन कोळसा किंमत 3 लाख 77 हजार 300 असा एकूण 33 लाख 77 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भादवी कलम 379, 407, 411, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील दोन आरोपीचा शोध पोलीस घेत असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उप.वि.पो.अ. संजय पूजलवार, पो.नि.वैभव जाधव, डी.बी.पथकाचे पोउपनि गोपाल जाधव, पोउपनि शिवाजी टिपुणे, पोहवा सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्मपाल मोहाडे, हरिद्रंभरती, पंकज उंबरकर, दिपक वंंडर्सवार, पुरुषोत्तम इडमल यांनी केली.