काडतुस भरलेल्या पिस्तुलसह तडीपारांना अटक

0
792
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कंबरेला देशी कट्टा खोसून बलारपूरात फिरत होते रात्री

चंद्रपूर : रात्रीच्या सुमारास कमरेला खोसून काडतुस भरलेल्या पिस्तुलसह दोन आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी (18 मार्च 2021) रात्रीच्या सुमारास करण्यात आलेली आहे. येदुराज उर्फ (बच्ची)रामनरेश आरक रा, सुभाष वॉर्ड, फारुख ऐय्याश शेख रा, बालाजी वॉर्ड असे आरोपींचे नाव असून ते तडीपार आहे.

गुरुवारी रात्री, शहरातील हद्दपार झालेला(तडीपार)येदुराज उर्फ (बच्ची)रामनरेश आरक रा, सुभाष वॉर्ड हा आरोपी कमरेला खोसून देशी कट्टा (पिस्तूल)घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळाली. त्या माहितीच्या आधारे ठाणेदार उमेश पाटील यांनी, आपल्या सहकार्यांसोबत वस्ती विभागात शोधमोहीम राबविली. रात्री एक वाजताच्या दरम्यान बच्ची उर्फ येदुराज (29)व साथीदार फारुख ऐय्याश शेख रा, बालाजी वॉर्ड या दोघांना मोटारसायकल वर फिरत असतांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचा कडून कमरेला खोसलेली देशी कट्टा (पिस्तूल)व साथीदार फारुख याचा खिशात दोन जिवंत काडतुसे मिळाली. दोघांनाही अटक करण्यात आली. दोघांवरही कलम 425 भारतीय हत्यार कायदा व142 (महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर आरोपी मोठी घटना करण्याच्या उदेश्याने फिरत होते. परंतु पोलिसांनी समयसुचकतेने त्यांना अटक केल्याने मोठा घटना टाळता आली. ही कारवाई ठाणेदार उमेश पाटील, API गायकवाड, API मुलाणी, PSI टेंभुर्णें,PSI चांदोरे, ना, पो, शी, सतीश पाटील, शरद कुडे,सीमा कोरते, विशिष्ट रंगारी यांनी केली.