घुग्घुस : येथील पोलीस स्टेशन येथे आरोग्य विभाग व पोलीस विभागाने मोहीम राबवून विना मास्कने फिरणाऱ्यांची अँटीजेन व आरटीपिसीआर तपासणी केली.
यावेळी 105 नागरिकांची अँटीजेन व आरटीपिआर तपासणी करण्यात आली यात अँटीजेन तपासणी केलेले 105 नागरिक निगेटिव्ह निघाले तर आरटीपिसीआर तपासणीचा अहवाल दोन दिवसांनी मिळणार आहे.
ही मोहीम डॉ. माधुरी मेश्राम तालुका आरोग्य अधिकारी चंद्रपूर डॉ. श्रद्धा माडूरवार यांच्या मार्गदर्शनात लॅब टेक्निशियन सायली साखरकर, नर्स श्रद्धा धोटे, प्रणाली बडोले चालक सचिन गिऱ्हे यांनी पोलिसांच्या मदतीने राबविली.