मोहरर्म “यौमें अशुरा ‘ निमित्त घुग्घुस येथे विविध ठिकाणी ‘पुलाव’ शरबत वितरण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ)यांचे वारस त्यांचं नातू इमाम हुसेन व त्यांच्या भाऊ बांधवाना युद्धात मिळालेल्या यातनाचे दहा दिवस दुःख व्यक्त केल्या जातो. सुरवातीच्या दहा दिवसाला अशुरा म्हटल्या जातो.

यजीद याला इस्लाम धर्माचा बादशाह बनण्यासाठी व लोकांना गुलाम बनविण्यासाठी अत्याचार शुरू केले .
मात्र इमाम हुसैन यांनी त्यांच्या अत्याचारापुढे झुकण्यास नकार देत केवळ आपल्या परिवारातील 72 लोकांसह यजीदच्या हजारो सैन्या सह युद्ध पुकारले अनेक दिवस अन्न पाण्या शिवाय हे युद्ध चालले एक – एक करीत सर्व शहिद होत गेले. शेवटच्या दहाव्या दिवशी इमाम हुसैन हे शहीद झाले युद्धात दिलेल्या त्यागाचा आठवणीत ” ताजिया” सजवून आनंद व्यक्त केला जातो.

आज अशुराच्या दिवशी कुणी अन्न पाण्या शिवाय राहू नये या करिता घुग्घुस येथील विविध ठिकाणी शरबत व पुलाव वितरण करण्यात आले. घुग्घुस येथील गांधी चौकात राजूरेड्डी, रियाजुल हसन (नेताजी),मुन्ना भाई लोहानी,सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, शेख शमीउद्दीन,नौशाद सिद्दिकी, विशाल मादर, रोशन दंतलवार, अय्युब कुरेशी, जुबेर शेख, वस्सी शेख, अंकुश सपाटे, सचिन कोंडावार,शुभम घोडके, रोहित डाकूर, रंजित राखूनडे,ताजु शेख,साहिल सैय्यद,देव भंडारी, व मित्र परिवार यांच्या तर्फे पुलाव वितरण करण्यात आले.