धानोरा – गडचांदुर मार्गवरील वर्धा नदीचा पूल पाण्याखाली – वाहतूक बंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मागील दोन – तीन दिवसापासून थोडा थोडा वेळ थांबून सतत होत असलेल्या पाऊसा मुळे धानोरा – गडचांदूर, भोयेगाव पुला वरून पाणी वाहू लागले आहे.

सोबतच धरणाचे पाणी ही सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गडचांदूर – चंद्रपूर मार्गावरील भोयगांव – धानोरा वर्धा नदीचा पूल पाण्याखाली आल्याने शुक्रवारच्या रात्रीपासून वाहतूक बंद झाल्याची बातमी मिळाली आहे. वाहतूक बंद झाल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाची मोठी रांग लागली आहे.

गडचांदुर – कोरपना आवारपुर वरून भोयेगांव मार्गी चंद्रपूर – घुग्घुस कडे जाणाऱ्या लोकांना दुसऱ्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून जावे लागत आहे.