‘त्या’ अनाथांना ” नाथच उरला नाही…

संशयीत आरोपी ‘नानबच्चा’ उत्तर प्रदेशात ?

चंद्रपूर : घुग्घुस येथील अमराई वॉर्डात राहणारे सूरज गंगाराम माने,व त्यांच्या धर्मपत्नी सौ. रत्नमाला सुरज माने यांचे संशयित रित्या मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या दाम्पत्याचे दोन चिमुकले नऊ वर्ष आणि दोन वर्षे हे अनाथ झाले असून यांना वालीच उरला नाही.

मृतकाच्या नातेवाईकांनी हे आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप करून परिसरातील ‘नानबच्चा’ हाच संशयित आरोपी असून त्याला तातळीने अटक करण्याची मागणी केली.

सदर संशयित आरोपी याने घटनेच्या दोन दिवसांपूर्वी नकोडा येथून नवीन सिम घेतले होते.पोलीस आरोपीच्या मागावर असून तो उत्तर प्रदेश फरार झाल्याचा अंदाज आहे.

काल आमदार तसेच पोलीस अधिक्षकांनी ही घटनास्थळी भेट दिली असून पोलीसानी पाच सहा लोकांना ताब्यात घेऊन चौकशी ही केली आहे.
मात्र घटनेचा उलगडा  ‘नानबच्चा’ मिळाल्या नंतरच होईल.