अडीच वर्षांच्या वैदिशाला 200 देशांच्या राजधान्या मूकपाठ

0
269
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राष्ट्रध्वजाचीही आहे माहिती; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

चंद्रपूर : वैदिशा वय वर्षे अडीच. धावण्या, पळण्याच्या या वयात तिला जगभरातील दोनशेहून अधिक देशांच्या राजधान्या मूकपाठ. नुसत्या राजधान्याच नाही, तर कोणत्या देशाचा कोणता राष्ट्रध्वज आहे हेही ती फडफड सांगते. तिच्या या अङ्काट बुद्घिमत्तेची दखल इंडिया बूक ऑफ रेकॉर्डने घेतली. तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करून तिचा राष्ट्रीयस्तरावर गौरव केला.

मूळचे अकोला येथील वैभव शेरेकर हे बँक ऑफ इंडियात अधिकारी पदावर कार्यरत आहे. वैभव आणि पत्नी दीपाली यांची वैदिशा एकुलती एक मुलगी. वैदिशा दीड वर्षांची असताना वडिलांनी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून फळ, भाजीपाला, पक्षी, प्राणी यांचे चार्ट तिच्यासाठी आणले. घरातील qभतीवर चिटकवून वैदिशाला त्याची ओळख करून दिली.

एक-दोन दिवसांत ती अचूक पक्षी, फळे, प्राणी ओळखू लागली. तेव्हाच तिच्यातील बुद्धिमत्तेची कल्पना शेरेकर दामपत्यांना आली. दिवसेंदिवस तिच्यातील प्रगती बघून शेरेकर दामपत्यांनी मध्यप्रदेशात असलेल्या रायपूर येथील मावशी शुभांगी थेटे यांना याची माहिती दिली. त्यांनाही वौदिशाच्या बुद्धिमत्तेची कल्पना आली. त्यांनी विविध देशांच्या राजधान्या, तेथील ध्वज याची माहितीबाबत सांगितले. त्यानंतर वैभव शेरेकर यांनी सुरवातीला तिला मोबाईलमध्ये विविध देश, त्यांची राजधानी, त्यांचे ध्वज यांची माहिती दाखविली. दोन-तीन दिवसांनी परत ते दाखविण्यात आले. तेव्हा वैदिशाने न चुकता देश, राजधानी आणि ध्वज ओळखले. तेव्हाच तिच्यातील बुद्धिमत्तेची कल्पना वैभव शेरेकर, दीपाली शेरेकर यांना आली. त्यानंतर त्यांनी विविध देश, तेथील राजधानी आणि ध्वजाचा चार्टच वैदिशासाठी आणला. नोव्हेंबर महिन्यांपासून आईने तिला देश, राजधानी, ध्वज याची माहिती देण्यास सुरवात केली. काही दिवसांतच वैदिशा विचारलेले देश, त्यांची राजधानी फडाफड सांगत आहे.

वैदिशाची बुद्धिमत्ता बघून तिच्या मावशीने इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नाव नोंदविण्यास सुचविले. त्यानुसार शेरेकर यांनी वैदिशाची संपूर्ण माहिती, ती सांगत असलेले व्हिडिओ तयार करून पाठविले. त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये समाविष्ट करण्यात आले. इंडिया बुक ऑफ रेकार्डनुसार भारतातील ती अशी एकमेव मुलगी असल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे.

अत्यंत कमी वयात वैदिशाने हा विक्रमकेला आहे. आता गिनिज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये तिचे नाव नोंदविले जावे या उद्देशाने आम्ही तिच्याकडून सराव करवून घेत आहोत.
वैभव शेरेकर, वडील