‘ प्रकाश ‘ उजडतोय ‘दादा’ च्या सावलीत !

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

दादांचा एकच नारा ” सबका साथ अपना विकास”

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक राजकीय पक्ष असून या पक्षाचे नेत्यांना भाऊ, दादा, भैय्या, युवा नेते असे संबोधित केल्या जाते. हे नेते आपल्या पक्षवाढी साठी सतत प्रयत्नरत असतात.

कुणी सत्तेत तर कुणी विरोधात असतात मात्र काही नेते पक्ष वाढविण्यासाठी नाही तर पक्ष संपविण्या साठी झटत असतात. असाच चित्र चंद्रपूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

ग्रामीण क्षेत्रातील प्रकाशमय नेते आणि त्यांचा घुग्गुसचा लाँन मागील सहा वर्षांपासून दादाचा ‘स्वागत’ करीत आहे. वर्षाचे बारा महिने कोरोना काळातील संचारबंदीत सुद्धा ‘ दादा’स मॉर्निंग वॉक टीम पक्ष विपक्ष सारे भेद विसरून सराव करीत असतात. याठिकाणी दोन्ही प्रमुख नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे आभास होतो.

शहराला प्रदूषित करणाऱ्या एका कंपनीत ‘मोठया ‘विवेक’तेणे ‘श्रीगणेश’ करून कोळशाचे डीओ घेऊन प्रतीमाह लाखो रुपयांचा व्यवसायात ‘श्रीगणेश’ शुरू आहेत.

औद्योगीक नगरीचे दादांनी आपल्या ‘विवेक’तेणे शहरातील सर्वच राजकीय पक्षात आपली ‘ “B” टीम तैयार करून ‘ Once Upon Time In Mumbai’ च्या धर्तीवर (माणिकपूर) वर राज करू इच्छितो.

शहरात शुरू असलेली नेत्यांची ही जुगलबंदी परिसरात चर्चेचे विषय झाले आहे.