एकाच कुटूंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सासूसह, मेहुणीची हत्या करून मारेकऱ्याची आत्महत्या  

नागपूर : कौटुंबिक कलहातून नागपुरात एकाच कुटूंबातील पाच सदस्यांची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि २१)उघडकीस आला. पाचही जणांना मारून मारेकऱ्यानेही स्वत: आत्महत्या केली आहे. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी (दि २१)सकाळच्या सुमारास घडली आहे.

पाचपावली नजीक रंभाजी रोडवर राहणार्‍या आलोक नावाच्या या मारेकऱ्याने त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, सासू आणि मेव्हण्याची हत्या केली. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. नागपूरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने शहर आणि आसपासचा परिसर हादरला आहे.

या घटनेची माहिती मिळताच नागपुरातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहेत. ही हत्या का करण्यात आली आहे या बाबत मारेकरी असलेल्या आलोकने काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.