कोरोना काळात घुग्घुस काँग्रेसचे राजुरेड्डी व टीमचे कार्य उत्कृष्ट : प्रकाश देवतळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने देशात व राज्यात थैमान घातले काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची चिंता न करता नागरिकांना यथा संभव मदद केली.

या काळात कार्यकर्त्यान सोबत बैठका होऊ शकल्या नाही या करिता 20 ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यलयात ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश जी देवतळे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली.
सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले.

ज्येष्ठ नेते शेषराव ठाकरे, मुन्ना लोहानी, शामराव बोबडे, शेख शमीउद्दीन, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, महिला अध्यक्ष सौ. विजया बंडीवार, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोशन पचारे यांनी पक्ष सोडून गेलेल्या कावळ्याची चिंता न करता आपल्या सोबत असलेल्या मावळ्यांन सोबतच आपल्याला नगरपरिषद निवळणुकीचा किल्ला लढवायचा आहे.

काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी परिसराततील युवकांना रोजगार मिळणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा असून आम्ही स्थानिक रोजगारासाठी कटिबद्ध व प्रामाणिक असून घुग्घुस शहराला स्वच्छ शहर करण्याचा आमचा निरंतर प्रयास होत असून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहो. नगरपरिषदेत जर आमची सत्ता आल्यास आम्ही घुग्घुस शहराचा सर्वांगीण विकास करून एक आदर्श उदाहरण ठेवू असे प्रतिपादन केले.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात शहर काँग्रेस कमिटीचे कार्य जिल्हा स्तरावर दखल घेण्या योग्य असून राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस उत्कृष्ट कार्य करीत असल्याचे प्रतिपादन केले.

येणाऱ्या नगरपरिषद निवळणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तन, मन, धनाने पक्ष बळकटी साठी प्रयत्न करावे व घुग्घुस नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा घुग्घुस शहराच्या विकासासाठी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी युवक काँग्रेस नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, प्रफुल हिकरे,सुरज बहुराशी,शेखर तंगडपल्ली,सौ.संगीता बोबडे, सौ.पदमा त्रिवेणी,सौ.पुष्पा नक्षीने,संध्या मंडल,सिनू गुडला,विजय माटला,लखन हिकरे, प्रेमानंद जोगी, नुरूल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी,रोशन दंतलवार, विशाल मादर,सचिन कोंडावार,अंकुश सपाटे,जावेद कुरेशी,अय्युब कुरेशी, जुबेर शेख, शुभम घोडके, कपील गोगला,साहिल सैय्यद,पप्पू कुरेशी, सुधाकर जुनारकर, रंजित राकुंडे,सुनील पाटील,अय्युब कुरेशी,अंकेश मडावी, कोंडय्या तलारी, व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.