कपिल गोगला यांचा कार्यकर्त्यासह काँग्रेस प्रवेश; राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते प्रवेश संपन्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : राज्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले, पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांचे राजकीय व सामाजिक कार्य बघून मोठ्या प्रमाणात युवकांचा कल काँग्रेस पक्षाकडे वळत आहे.

20 ऑगस्ट रोजी घुग्घुस काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकी करीता आलेल्या जिल्हा ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या उपस्थितीत राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली केमिकल वॉर्ड क्रं 06 येथील युवा नेते कपिल गोगला यांनी आपल्या युवा कार्यकर्त्यांन सोबत पक्ष प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी काँग्रेस पक्षाचे दुप्पटे टाकून युवकांचे पक्ष प्रवेश करून त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले व काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, ज्येष्ठ नेते शेषरावजी ठाकरे, बाबा भाई कुरेशी, मुन्ना भाई लोहानी,कामगार नेते सैय्यद अनवर, युवक उपाध्यक्ष सुरज कन्नूर,युवक अध्यक्ष तौफिक शेख,शमरावजी बोबडे, शेख शमीउद्दीन, महिला अध्यक्षा सौ. विजया बंडीवार, सौ.संगीता बोबडे, सौ.पदमा त्रिवेणी, सौ.पुष्पां नक्षीने, संध्या मंडल,शेखर तंगडपल्ली, प्रफुल हिकरे,प्रेमानंद जोगी,सिनू गुडला, विजय माटला,नुरुल सिद्दिकी,सुरज बहूराशी,इर्शाद कुरेशी,विशाल मादर,रोशन दंतलवार, कोंडय्या तलारी,जावेद कुरेशी,सुधाकर जुनारकर,देव भंडारी, सचिन कोंडावार, अंकुश सपाटे, रणजित राखूनडे,शुभम घोडके, साहिल सैय्यद, सुनील पाटील,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते