काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत गैरहजर राहणारे काँग्रेसचे की, ‘B’ टीमचे ?

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : एक दशका पासून घुग्घुस शहरात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवळणुकीत काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षालाच पोखरणाऱ्या भीतरघातकी कार्यकर्त्या विरोधात कार्यकर्त्यांत प्रचंड आक्रोश दिसून आला.

20 ऑगस्ट रोजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशजी देवतळे यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. इतर कुठल्याही अन्य ठिकाणी बैठक घेतल्यास इतरांना गैर सोयीचे होऊ म्हणून सदर बैठक कार्यलयातच घेण्यात आली. आढावा बैठकीची सूचना एक दिवस आधी समाज मध्यम व पोर्टल न्यूज, व अन्य माध्यमातून देण्यात आली.

कार्यक्रमात नव्वद टक्के आजी – माजी युवक,पुरुष,महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित झाले मात्र निवळक तळ्यात की मळ्यात असलेले “फ्रेंड्स” क्लबच्या नावाने पक्षात फूट पडण्याचा प्रयत्न करणारे दोन चार कार्यकर्ते बैठकीत उपस्थित न होता,
नाराजीच्या बातम्या लावत आहे. पक्षात राहून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे हे पक्षाचे कार्यकर्ते आहे की विरोधी पक्षाच्या ताटाखालचे मांजर आहे
असा प्रश्न कार्यकर्त्याना पडला आहे. येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवळणुकीत यांचा खरा चेहरा उघड होईल की नाही हा येणारा काळच सांगेल !