भाजप महानगर अध्यक्ष डॉ गुलवाडे यांना पुरातत्व विभागाची नोटीस

0
460
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शहर हे संपूर्णतः चारही बाजूने किल्ल्याने वेढलेले शहर आहे, पुरातन वस्तूच्या १०० मीटर अंतराच्या कोणतेही बांधकाम करू नये यासाठी पुरातत्व विभागाने कठोर नियम बनविले आहे, परंतु शहरातील बहुतांश भाग हा किल्ल्याच्या १०० मीटरच्या आत वसलेला आहे. शहरातील प्रख्यात डॉक्टर भाजपचे शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे यांना पुरातत्व विभागाने नोटीस बजावून पुरातत्व विभागाकडून बांधकाम/दुरुस्ती करण्यासंबंधी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासंदर्भात सूचना केल्या आहे.

जटपुरा गेट जवळील बहुतांश भाग हा किल्ल्याला लागनूच आहे, त्याठिकाणी असलेले अनेक घर हे पुरातत्व विभागाच्या कायद्याला नाकारून निर्माण करण्यात आले आहे. डॉ गुलवाडे यांना प्राप्त नोटीस मध्ये प्रतिबंधित क्षेत्र असताना सुद्धा आपण विना परवानगीने घराचे नवीनीकरण अथवा बांधकाम करू शकत नाही आपण तात्काळ ते कार्य थांबवून संबंधित विभागाशी संपर्क साधत ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे अन्यथा आपलेवर कडक कारवाई करण्यात येणार अशी सूचना त्या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.