दुसऱ्यांदा घरवापसी, परिसरात चेष्टेचा विषय
घुग्घुस : येथील शिवसेनेचे नेते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चिकणकार यांनी 12 डिसेंम्बर रोजी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेश घेतला यामुळे सेनेला खिंडार पडल्याचे भाजप तर्फे बोलल्या जात होते त्यांचे पक्ष प्रवेशाचे गावभरात बॅनर लावले गेले असतांना प्रभाकर चिकणकार यांनी दोन दिवसांतच घर वापसी केली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी ही त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून दुसऱ्याच दिवशी घरवापसी केली होती यामुळे संपूर्ण घुग्घुस शहरात याप्रकरणाची जोरदार चर्चा असून भाजपात शुरू असलेली रस्सी खेच जनतेच्या करमणुकीचे साधन होत आहे.
गेल्या काही वर्षांत भाजप तर्फे काँग्रेस व अन्य पक्षाचे सौ. प्रतिभा इंगोले, (काँग्रेस) शंकर गोगुला (काँग्रेस), संतोष नूने (काँग्रेस), प्रकाश बोबडे (काँग्रेस), सौ. नंदा कांबळे (काँग्रेस) बबलू सातपुते, यासह अन्य नेत्यांना भाजपाने साम दाम दंड भेदचा वापर करून आपल्या पक्षात सामावून घेतले आहे.
अन्य पक्षाच्या नेत्याच्या बळावरच भाजप सत्तेत येत असते मात्र यावेळेस त्यांची ही प्रवृत्ती त्यांच्यावरच उलटली असून चिकणकार प्रकरणातुन गावभारत भाजपची नाचक्की होत आहे
प्रभाकर चिकणकार यांच्याशी संपर्क साधला असता मला धोक्यात ठेवून हे पक्ष प्रवेश करवून घेतल्यामुळे मी माझ्या पक्षात परत आलो असून मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षवाढीसाठी परिश्रम घेईल असे सांगितले.